संगणक परिचालक संघटनेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:57 IST2021-03-06T18:56:52+5:302021-03-06T18:57:15+5:30
मानोरी : राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परीचालकांना आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती आणि किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन १३ दिवसानंतरही मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असून ग्रामपंचायतीचा गावगाडा विस्कळीत झाला असून संगणक परीचालकांचे आंदोलन पोलिस यंत्रणेमार्फत शासनाकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया संगणक परीचालकांकडून देण्यात आली आहे.

संगणक परिचालक संघटनेचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
मानोरी : राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परीचालकांना आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती आणि किमान वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन १३ दिवसानंतरही मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असून ग्रामपंचायतीचा गावगाडा विस्कळीत झाला असून संगणक परीचालकांचे आंदोलन पोलिस यंत्रणेमार्फत शासनाकडून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया संगणक परीचालकांकडून देण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करत असलेले संगणक परिचालकांचे न्याय मागणीसाठी बेमुदत काम बंद आंदोलन २२ फेब्रुवारी पासून आझाद मैदानावर सुरू आहे. यावेळी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात आली.
मात्र मंत्रांच्या घरी मोर्चा गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत अनेक संगणक परीचालकांना रेल्वे स्थानकावर सोडून दिले तर काही संगणक परीचालकांना पोलिसांकडून मारहाण देखील केल्याचा आरोप संगणक परीचालकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान १ मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सूरु असून या अधिवेशनात देखील संगणक परीचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने संगणक परीचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून शासनाने तात्काळ संगणक परीचालकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करून न्याय देण्याची मागणी संगणक परिचालक संघटनेकडून केली जात आहे.