कॉर्पोरेशन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 3, 2017 16:57 IST2017-05-03T16:57:16+5:302017-05-03T16:57:16+5:30
कॉर्पोरेशन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

कॉर्पोरेशन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
नाशिक : वडाळा-पाथर्डी रोडवरील श्रद्धाविहार कॉलनीतील कॉर्पोरेशन बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़ २) सकाळच्या सुमारास घडली़
मनोजकुमार सुधाकर पाठक (रा. कालिका पार्क, दीपालीनगर, नाशिक) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार श्रद्धाविहार कॉलनीत कॉपोर्रेशन बँकेचे एटीएम आहे. सलग दोन दिवसांच्या सुट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी एटीएममध्ये रोकड भरण्यात आली होती. चोरट्यांनी सकाळच्या सुमारास हे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही़ असे असले तरी एटीएम मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)