त्र्यंबकेश्वर बस स्थानकाच्या आधुनिकीकरण कामाचे भुमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:31 IST2020-02-16T15:26:43+5:302020-02-16T15:31:29+5:30
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीवर पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे आ िणती चालवायला एसटीला जे मारक आहे ते थांबवण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर बस स्थानकाच्या आधुनिकीकरण कामाचा भुमिपुजन समारंभ गावातील जुने बस स्थानक येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

त्र्यंबकेश्वर येथे बस स्थानकाच्या उद्घाटनकार्यक्रमादरम्यान मंदिरात आरती करताना परिवहन मंत्री अनिल परब
यावेळी खासदार हेमंत गोडसे आमदार हिरामण खोसकर व नरेंद्र दराडे त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर ,मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, नगरसेविका मंगला आराधी,विभाग नियंत्रक कल्पना लहांगे अधिकारी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भूमिपूजन करून मी माझ्या कामाला प्रारंभ करीत आहे. येथे माझ्या कामाला सुरूवात होणे हे माझे भाग्य आहे.
एक हजार चौरस मीटर परिसरात हे अद्यावत बसस्थानक साकारणार आहे.सन १९८७सालीत्र्यंबकेश्वर डेपोसाठी श्रीपंचायती उदासिन बडा अखाड्याची जागा परिवहन महामंडळाने घेतली आहे. त्याठिकाणी लवकरच डेपो साकारणार आहे. याशिवाय बस डेपो कार्यान्वित होईपर्यंत येथे जादा बसेस ठेवण्यात येतील. त्र्यंबकेश्वर बस स्थानकात आजही खासगी वाहने,रिक्षा,प्रवासी टॅक्सीकडूनप्रवासीवाहतुककेलीजाते..खासगीवाहनांकडूनप्रवासीआतासुखसुविधांमुळेएसटीकडेवळणारआहे.प्रसाद योजनेच योजनेच्या माध्यमातून पर्यटनाच्या दृष्टीने शहराचा कायापालट होत आहे. यात पर्यटनाच्या व तिर्थस्थळाच्या पाशर््वभूमीवर त्र्यंबकेश्वर बस स्थानक व त्र्यंबकेश्वर बस डेपोच अत्याधुनिकी याच महिन्यातच सुरु होत आहे.याकामाची निविदा देखील काढण्यात येउन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरु वात होणार आहे असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी केले.