सटाण्यात महिलांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 00:56 IST2017-10-14T00:56:25+5:302017-10-14T00:56:30+5:30

Attack women in the crowd | सटाण्यात महिलांचा हल्लाबोल

सटाण्यात महिलांचा हल्लाबोल

सटाणा : मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि. कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करून चार महिने उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या चारशे ते पाचशे गुंतवणूकदारांनी आज दुपारी शहरातून मोर्चा काढून सटाणा पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यासमोर एक तास ठिय्या देऊन पोलीस प्रशासनाविरु द्ध घोषणाबाजी केली.
ठेवीदारांनी कंपनीच्या वरिष्ठांकडे चौकशी केली असता व्याजासह पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात येते; मात्र वर्ष दीड वर्ष उलटूनही पैसे न मिळाल्याने शेकडो ठेवीदारांनी सटाणा पोलीस ठाण्यात गेल्या ६ जुलैला कंपनीचे संचालक लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर, विजय शंकर तावरे (दोघे राहा. विरार, मुंबई) यांच्या विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आला. मात्र चार महिने उलटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त चारशे ते पाचशे ठेवीदार महिला व पुरुषांनी शुक्रवारी (दि. १३) दुपारी १ वाजता शहरातील शिवाजीमहाराज पुतळ्यापासून मोर्चा काढला. ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने हा मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. यावेळी संतप्त महिलांनी हल्लाबोल करून पोलीस प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी मोर्चेकºयांना सामोरे जात मैत्रेय कंपनीने फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचा तपास योग्य पद्धतीने सुरू असून, लवकरच ठेवीदारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात राकेश सैंदाणे, महेंद्र अहिरे, प्रशांत शिरोडे, नटराज शिरोडे, जिजाबाई सोनवणे, आशा बागड, ज्योती ठाकरे, कमोदिनी सोनवणे, मीना धामणे, रूपाली धामणे, माधुरी भावसार, ज्योती अहिरे, कुसुम सोनवणे, सविता सोनवणे, सुनंदा जाधव, वंदना अहिरे, उज्ज्वला नेर, सुरेखा देवरे, पुष्पा कोठावदे, रंजना शिरोडे, सुरेखा मेटकर, प्रमिला सोनवणे, शैला मांडगे, रेखा विसपुते, प्रमिला भामरे, सुनीता अमृतकर, शोभा सोनवणे, मनीषा मुंडावरे, प्रभावती साळवे, निशा अहिरे, भारती कदम, सुनीता वाघ आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Attack women in the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.