‘पाप्या’च्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:24 IST2017-08-20T22:22:26+5:302017-08-21T00:24:31+5:30
पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शनिवारी (दि़१९) सायंकाळी पवार याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती़

‘पाप्या’च्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हल्ला
नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत बालगुन्हेगार हृतिक ऊर्फ पाप्या राजू शेरगिल याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल याने आपल्या सहा साथीदारांसमवेत खुनातील प्रमुख संशयित चेतन संजय पवार (१७, शनिमंदिराशेजारी, पेठरोड, नाशिक) याच्यावर तिबेटीयन मार्केटमध्ये प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शनिवारी (दि़१९) सायंकाळी पवार याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती़ ७ फेबु्रवारी २०१७ रोजी पेठरोडवरील मोती सुपर मार्केटजवळ पाप्या शेरगिल याचा खून करण्यात आला़ या खुनातील प्रमुख संशयित चेतन पवार याची शनिवारी (दि़१९) उंटवाडीतील बाल न्याय मंडळात तारीख होती़ त्यासाठी पवार हा आपल्या आई-वडिलांसमवेत तारखेसाठी हजर होता़ यानंतर तिबेटीयन मार्केटमध्ये कपडे खरेदीसाठी गेलेल्या चेतन पवार याच्या मागावर असलेले संशयित विक्की बाळू जाधव ऊर्फ काळ्या तोतरा, पाप्याचा भाऊ हरीश ऊर्फ हºया शेरगिल, रोहन अहिरे, राकेश पवार, गौतम ताठे, ललित ऊर्फ लल्या सुरेश राऊत व अजय भईटा या संशयितांनी चाकू, कोयता व चॉपरने डोके व पाठीवर वार केले़ या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चेतन पवार यास प्रथम जिल्हा रुग्णालय व त्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, याप्रकरणी संजय रामलाल पवार यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे़ दरम्यान, सरकारवाडा पोलिसांनी संशयित हरीश ऊर्फ हºया शेरगिल व ललित ऊर्फ लल्या सुरेश राऊत यांच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे़