पोलीस ठाण्याजवळ कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST2021-03-24T04:13:45+5:302021-03-24T04:13:45+5:30

या मारहाण प्रकरणी मायको दवाखाना पाठीमागे राहणाऱ्या अजय विश्राम मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गोकुळ येलमामे, रवींद्र ...

Attack with a scythe near a police station | पोलीस ठाण्याजवळ कोयत्याने हल्ला

पोलीस ठाण्याजवळ कोयत्याने हल्ला

या मारहाण प्रकरणी मायको दवाखाना पाठीमागे राहणाऱ्या अजय विश्राम मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गोकुळ येलमामे, रवींद्र अहिरे, गोपाळ गोरे व सोनू वारुंगसे असे या चौघांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या रविवारी रात्री मोहिते व त्याचा नातेवाईक अनिल आठवले असे दोघे जण कृषी उत्पन्न बाजार समितीतून घरी जात असताना संशयित आरोपी फिर्यादीचा आतेभाऊ असलेल्या सोनू डॅनियल खंदारे याला मारहाण करत होत. त्यावेळी मोहिते व आठवले यांनी मध्यस्थी करून मारहाण का करत आहे याची विचारणा केली असता संशयितांना राग आल्याने त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली, तसेच वारुंगसे याने हातातील कोयत्याने खंदारे याच्या पाठीवर वार केला.

या घटनेतील संशयित पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Attack with a scythe near a police station