युवकाचे अपहरण करून हल्ला
By Admin | Updated: April 20, 2016 00:09 IST2016-04-19T23:53:59+5:302016-04-20T00:09:59+5:30
युवकाचे अपहरण करून हल्ला

युवकाचे अपहरण करून हल्ला
नाशिक : मारहाण प्रकरणात पोलिसांत साक्ष देणाऱ्या अल्लाउद्दीन अस्लम शेख (रा. सय्यद पीर बाबा चौक, गंजमाळ) या युवकाचे अपहरण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास पखालरोडवर घडली़ मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अल्लाउद्दीन शेख हा दुचाकीवरून (एमएच १५, एझेड ७४२२) सारडा सर्कल येथून शिंगाडा तलावाकडे जात होता़ दुचाकीचा पाठलाग केला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर शेखने आपली दुचाकी बग्गा स्वीटजवळ थांबविली़ यावेळी टाटा सफारीमध्ये आलेले (एमएच १५, डीआर २९२९) संशयित जाकिर सय्यद याने शेखला थांबवून तू आमच्या विरोधात पोलिसांत साक्ष का दिली असे म्हणून मारहाण करीत गाडीत घातले़ यानंतर अल्लाउद्दीन शेखला पखालरोडवरील अशोका स्कूल परिसरात नेऊन जबर मारहाण केली तसेच त्याच्याकडीत २० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले़
याप्रकरणी पोलिसांनी संशयित जाकीर सय्यद, सलमान सय्यद, मोमान सय्यद, हसन सय्यद, हनिफ कोकणी, जाकीर कोकणी, इम्रान खान, अरबाज खान आदि सतरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)