महापालिकेच्या  करवाढी विरोधात हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:08 IST2018-03-01T01:08:13+5:302018-03-01T01:08:53+5:30

महापालिकेच्या प्रस्तावित घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात आज सिडको विभाग राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Attack against the increase in municipal corporation | महापालिकेच्या  करवाढी विरोधात हल्लाबोल

महापालिकेच्या  करवाढी विरोधात हल्लाबोल

सिडको : महापालिकेच्या प्रस्तावित घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात आज सिडको विभाग राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.सिडको विभाग राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मनपाच्या करवाढी विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. प्रदेश सरचिटणीस नाना महाले, मनपा गटनेते गजानन शेलार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विभाग अध्यक्ष मकरंद सोमवंशी, पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिमूर्ती चौक येथून पवननगरमार्गे मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी अशी घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्याची तयारी सुरू केली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सत्ताधारी पक्षाकडून सर्वसामान्य नाशिककर, कष्टकरी कामगार व स्वयंरोजगारी करणारे चाकरमाने अशा सर्वांवरच अन्यायकारक करवाढ केली असून, नागरिकांची दिशाभूल करण्यात आली असल्याचा आरोप राष्टÑवादीच्या वतीने करण्यात आला. यावेळी डॉ. सुनीता कुमावत यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात दत्ता पाटील, मुक्तार शेख, अमोल महाले, वैभव देवरे, अमोल नाईक, कुणाल बगाडे, सुनील दातीर, पुष्पा राठोड, सुनील कोथमिरे, सुनील अहिरे, रोहित पाटील, अनिता भामरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Attack against the increase in municipal corporation