महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:30 IST2020-08-23T23:36:43+5:302020-08-24T00:30:17+5:30
एका पीडित महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार करत एका नराधमाने दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात संशियत निलेश केशव वराडे (२७, रा. म्हसरुळ,मूळ रा. राहता, जि. अहमदनगर) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

महिलेवर अत्याचार
नाशिक : एका पीडित महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार करत एका नराधमाने दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात संशियत निलेश केशव वराडे (२७, रा. म्हसरुळ,मूळ रा. राहता, जि. अहमदनगर) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार संशियत निलेश वराडे याने डिसेंबर 2018 पासून वारंवार तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेने एका मुलीला जन्म दिला. पीडितेने निलेशला पालकत्व घेण्यास विचारले असता त्याने नकार दिला.
तसेच मुलीसह पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार याप्रकरणी भद्रकाली पोलीसांनी संशियत निलेशिवरु द्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.