मालेगावी अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 00:32 IST2020-11-13T00:32:28+5:302020-11-13T00:32:53+5:30
मालेगाव शहरालगतच्या द्याने येथील अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने रमजानपुरा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली आहे.

मालेगावी अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मालेगाव मध्य : शहरालगतच्या द्याने येथील अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीडित मुलीने रमजानपुरा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आशिष रमेश पगारे (२३, रा.कॅम्प) या तरुणाने मागील चार महिन्यांपूर्वी वेळोवेळी अत्याचार केला. अशा आशयाची फिर्याद पीडित तरुणीने दिली. रमजानपुरा पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात करीत आहे.