डांगसौंदाणेत बालिकेवर अत्याचार; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:20 IST2020-08-14T22:48:11+5:302020-08-15T00:20:09+5:30
भरदुपारी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ चौदावर्षीय बालिकेवर वॉटरमनने अतिप्रसंग केल्याने खळबळ उडाली आहे. सदर प्रकार बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे गुरुवारी (दि. १३) दुपारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

डांगसौंदाणेत बालिकेवर अत्याचार; एकास अटक
सटाणा : भरदुपारी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ चौदावर्षीय बालिकेवर वॉटरमनने अतिप्रसंग केल्याने खळबळ उडाली आहे. सदर प्रकार बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे येथे गुरुवारी (दि. १३) दुपारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास डांगसौंदाणे येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ चौदावर्षीय बालिका व तिची लहान बहीण सीताफळ तोडण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रमेश आनंदा सोनवणे (५४) या ग्रामपंचायतीच्या
वॉटरमनने तिला स्वत:च्या घरात ओढत नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. हा प्रकार पाहून पीडित बालिकेच्या बहिणीने तत्काळ तिच्या आई-वडिलांकडे घडलेला प्रकार कथन केला.
यावेळी पीडितेच्या आई-वडिलांनी घटनास्थळी धाव घेऊन संश्यिताच्या तावडीतून तिची सुटका केली. त्यानंतर सटाणा पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तत्काळ संशयित रमेश सोनवणे याला अटक करून त्याच्याविरुद्ध पोस्को तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सदर बालिकेची येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.