तळ्याचा पाडा येथे बालिकेवर अत्याचार

By Admin | Updated: April 25, 2017 02:14 IST2017-04-25T02:13:58+5:302017-04-25T02:14:09+5:30

पेठ : दिंडोरी तालुक्यातील तळ्याचा पाडा शिवारात असलेल्या पोल्ट्री फार्मवर कामावर असलेल्या परप्रांतीय कामगाराने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली

Atrocities against the girl at the pond | तळ्याचा पाडा येथे बालिकेवर अत्याचार

तळ्याचा पाडा येथे बालिकेवर अत्याचार


पेठ : दिंडोरी तालुक्यातील तळ्याचा पाडा शिवारात असलेल्या पोल्ट्री फार्मवर कामावर असलेल्या परप्रांतीय कामगाराने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली असून, पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. येथे सगुना पोल्ट्री फार्म असून, या ठिकाणी कामावर असलेल्या रवींद्र देशमुख (४५), रा. खंडवा (मध्य प्रदेश) याने मजुरीसाठी आलेल्या महिलेच्या चारवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. ही बाब तेथील सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यावर मुलीचे नातेवाईक व कामगारांनी संशयितास पकडून पोलिसांच्या हवाली केले. पेठ पोलिसांत नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितास अटक करण्यात आली आहे़

Web Title: Atrocities against the girl at the pond