शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

आत्मा मालिक सत्संग समितीतर्फे कोजागरी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 1:41 AM

आत्मा मालिक सत्संग समिती आणि आत्मा मालिक ध्यानपीठ नाशिक यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि.१२) औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे आत्मा मालिक कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

पंचवटी : आत्मा मालिक सत्संग समिती आणि आत्मा मालिक ध्यानपीठ नाशिक यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि.१२) औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे आत्मा मालिक कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आत्मा मालिक सत्संग समितीच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी संत दर्शन तसेच प्रवचनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.शनिवारी परम पूज्य सद्गुरू जंगलीदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कोजागरी पौर्णिमा उत्सव कार्यक्र मात आत्मतत्त्व, आत्मज्ञान, मोक्षप्राप्ती आत्मानुभव, ध्यानयोग, अभ्यासाची परिभाषा, आहार नियमन, आत्मशांती व मोक्षप्राप्ती सहज व सोपा मार्ग याची माहिती शिबिरात उपस्थित भाविकांना देण्यात आली. या कोजागरी पौर्णिमा उत्सवात योग प्राणायाम, मौन, ध्यान, भजन, प्रवचन यांसह प्रबोधन आदी विविध कार्यक्र म संपन्न झाले.संपूर्ण दिवसभर चाललेल्या कोजागरी पौर्णिमा उत्सवात उपस्थित संत-महंतांचे प्रवचन झाले. या अमृत श्रवण, संतदर्शन व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. रात्री चौदस कार्यक्र म निमित्ताने नाम दीक्षेचा (गुरूमंत्र) कार्यक्र म झाला. कार्यक्र माला आत्मा मालिक ध्यान पीठाचे संत परमानंद महाराज, निजानंद महाराज, गणेश महाराज, अन्य आश्रम निवासी संत आश्रमाचे सर्व विश्वस्त, नाशिक निवासी संत व भाविक उपस्थित होते. यावेळी प्रवचन कार्यक्र मानंतर उपस्थित भाविकांना कोजागरी पौर्णिमेनिमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकkojagariकोजागिरीReligious programmeधार्मिक कार्यक्रम