झाकीर हुसेन रुग्णालयाला आठवले यांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:09 IST2021-04-24T01:09:12+5:302021-04-24T01:09:42+5:30

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झालेल्या घटनेच्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी भेट दिली तसेच घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत शोकभावना प्रकट केली.

Athavale visited Zakir Hussain Hospital | झाकीर हुसेन रुग्णालयाला आठवले यांनी दिली भेट

झाकीर हुसेन रुग्णालयाला आठवले यांनी दिली भेट

नाशिक : महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झालेल्या घटनेच्या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी भेट दिली तसेच घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत शोकभावना प्रकट केली. 
यावेळी त्यांनी संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करुन घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करून रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Athavale visited Zakir Hussain Hospital