‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ निव्वळ मुर्खपणा : पुरुषोत्तम आवारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 20:18 IST2017-08-05T20:10:12+5:302017-08-05T20:18:27+5:30

सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे.

 'Astro OPD' net folly: Purushottam Awara | ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ निव्वळ मुर्खपणा : पुरुषोत्तम आवारे

‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ निव्वळ मुर्खपणा : पुरुषोत्तम आवारे

ठळक मुद्देदेशभरात सध्या विज्ञानाच्या वाढत्या गळचेपीमुळे वैज्ञानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी (दि.९) देशपातळीवर वैज्ञानिक रस्त्यांवर उतरून निषेध मोर्चा काढत आहेज्योतिषांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेतवैज्ञानिक दृष्टिकोणावर घाला भाजपा सरकारकडून विज्ञानाची होणारी गळचेपी यावर जोरदार टीका

नाशिक : सरकारी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात ‘अ‍ॅस्ट्रो ओपीडी’ सुरू करण्याचा मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेतलेला निर्णय मुर्खपणाचा आहे. या घातक निर्णयामुळे परिवर्तनाची चाके उलटी फिरणार असल्याची टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे यांनी केली.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटन वाढीसाठी नाशिकमध्ये आलेले आवारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा सरकारकडून विज्ञानाची होणारी गळचेपी यावर जोरदार टीका केली. यावेळी आवारे म्हणाले, महाराष्टÑ एकमेव राज्य आहे की या राज्यात जादूटोणाविरोधी कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. राज्यस्तरावर या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी समितीने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. मध्य प्रदेश सरकारकडून सरकारी रुग्णालयात ज्योतिषी सल्ला देण्याचा घेण्यात आलेला निर्णय एकप्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोणावर घाला घालणारा आहे. या निर्णयामुळे विज्ञानाची गळचेपी अधिक वाढणार आहे. सरकारी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात ज्योतिषी रुग्णांच्या हस्तरेषा, जन्मकुंडली बघून रोगाचे निदान करणार आहेत. तसेच जीवनरेषा तपासणार आहेत. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत, असा हा निर्णय मध्य प्रदेशच्या भाजपा सरकारने घेऊन लोकांना दैववादी बनविण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले आहे; मात्र अखिल भारतीय अंनिसचा या निर्णयाला प्रखर विरोध आहे.क
देशभरात सध्या विज्ञानाच्या वाढत्या गळचेपीमुळे वैज्ञानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संतापातूनच येत्या बुधवारी (दि.९) देशपातळीवर वैज्ञानिक रस्त्यांवर उतरून निषेध मोर्चा काढत आहे. या मोर्चांनाही समितीचा पाठिंबा असल्याचे आवारे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title:  'Astro OPD' net folly: Purushottam Awara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.