शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

By Admin | Updated: September 5, 2015 21:49 IST2015-09-05T21:48:29+5:302015-09-05T21:49:03+5:30

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

Assurance to solve teacher's problems | शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

नांदगाव : राज्यातील भाजपा शासनासमोर शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात मांडणार असल्याची ग्वाही नांदगाव मतदारसंघाचे आमदार पंकज भुजबळ यांनी शनिवारी येथे दिली.
येथील तहसील कार्यालयावर समन्वय समितीच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक नेते कचेश्वर बारसे, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह टी. एम. डोंगरे, एसएनडीटीचे संचालक अरुण पवार, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, टीडीएफचे तालुकाध्यक्ष आर. आर. मवाळ, सी. डी. आहेर, पालिका कर्मचारी संघटनेचे कैलास आहिरे आदिंच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यात
आला. बैठकीला आलेल्या आमदार भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, माजी सभापती साहेबराव पाटील या नेत्यासोबत आंदोलकांना भेट दिली व आंदोलनाला पाठिंबा दिला. बोलठाण, वेहेळगाव, पळाशी, सारताळे, साकोरा, कळमदरी, कोंढार आदि तालुक्यांच्या विविध भागातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने
या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Assurance to solve teacher's problems