गडाख टीचर्स सोसायटीकडून ठोक कुटुंबीयांना मदत

By Admin | Updated: October 9, 2016 00:21 IST2016-10-09T00:20:33+5:302016-10-09T00:21:09+5:30

गडाख टीचर्स सोसायटीकडून ठोक कुटुंबीयांना मदत

Assistance to the Holocaust family from the Gadak Teachers Society | गडाख टीचर्स सोसायटीकडून ठोक कुटुंबीयांना मदत

गडाख टीचर्स सोसायटीकडून ठोक कुटुंबीयांना मदत

सिन्नर : तालुक्यातल्या देवपूर येथील सूर्यभान गडाख सेकंडरी टीचर्स सहकारी क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने उरी हल्ल्यातील शहीद जवान संदीप ठोक यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली.
तालुक्यातील खडागंळी येथील संदीप ठोक हे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले होते. गडाख सेकंडरी टीचर्स सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दौलत मोगल व अध्यक्ष रावसाहेब तांबे यांच्या हस्ते ११ हजार रुपयांचा धनादेश संदीप यांचे वडील सोमनाथ व भाऊ योगेश यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी देवपूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. गडाख, दत्तात्रय आदिक, वडांगळी विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, वडांगळीचे उपसरपंच नानासाहेब खुळे, कडवा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीष कोकाटे, व्यवस्थापक वसंत निरगुडे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Assistance to the Holocaust family from the Gadak Teachers Society