घोटी राइस संघटनेच्या वतीने तांदळाच्या ६१ पोत्यांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:44 IST2020-03-28T23:42:40+5:302020-03-28T23:44:59+5:30
नाशिक : कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संचारबंदीत गोरगरिबांना जेवणाची भ्रांत पडू नये, यासाठी घोटी राइस अॅण्ड भगर मिल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला ६१ पोते तांदूळ मदत म्हणून सुपुर्द करण्यात आले.

इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे तांदळाच्या पोत्यांची मदत सुपुर्द करताना घोटी राइस अॅण्ड भगर मिल असोसिएशनचे पदाधिकारी.
ठळक मुद्देगोरगरिबांना जेवणाची भ्रांत पडू नये,
नाशिक : कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संचारबंदीत गोरगरिबांना जेवणाची भ्रांत पडू नये, यासाठी घोटी राइस अॅण्ड भगर मिल असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला ६१ पोते तांदूळ मदत म्हणून सुपुर्द करण्यात आले.
इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही पोती सुपुर्द केली. त्यात संघटनेचे अध्यक्ष नवसुखलाल पिचा, संजय चोरडिया, नितीन चोरडिया, गोटूशेट कुमट, विक्रम दुरगुडे, महेंद्र छोरिया यांचा समावेश होता.