शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

तीस टक्के जादाचे मूल्यांकन भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:44 AM

निफाड तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीसाठी भूसंपादन करताना सुमारे ९६ शेतकºयांसाठी जवळपास १६०० कोटींचे मूल्यांकन कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केल्याचे वृत्त आहे. अर्थात असे करताना काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी वाजवीपेक्षा तीस टक्के अधिक मूल्यांकन करण्याचा धक्कादायक प्रकारही घडला असून, त्यासाठी अधिकाºयांचे साटेलोटे असल्याचा आरोप काही शेतकºयांनी केला आहे. त्यामुळेच काही अधिकाºयांवर चौकशीचे तर काही ठिकाणी अतिरिक्त मोबदला दिल्याने वसुलीचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे.

गणेश धुरी ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निफाड तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीसाठी भूसंपादन करताना सुमारे ९६ शेतकºयांसाठी जवळपास १६०० कोटींचे मूल्यांकन कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केल्याचे वृत्त आहे. अर्थात असे करताना काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी वाजवीपेक्षा तीस टक्के अधिक मूल्यांकन करण्याचा धक्कादायक प्रकारही घडला असून, त्यासाठी अधिकाºयांचे साटेलोटे असल्याचा आरोप काही शेतकºयांनी केला आहे. त्यामुळेच काही अधिकाºयांवर चौकशीचे तर काही ठिकाणी अतिरिक्त मोबदला दिल्याने वसुलीचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. महापारेषण आणि पॉवर ग्रीड कंपन्यांसाठीच्या जमीन भूसंपादनाचे काम जिल्हा परिषदेच्या व राज्य सरकारी कृषी विभागातील अधिकाºयांनी केले, मात्र भूसंपादन आणि फळझाडांचे मूल्यांकन करताना चक्क ३० टक्के जादाचे मूल्यांकन करीत लाखोंची आर्थिक अनियमितता या अधिकाºयांनी केल्याचे नंतर माहिती अधिकारात उघड झाले आहे. २०१३-१४ मध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड या संस्थेच्या सार्वजनिक उपयोगासाठी भूसंपादनांतर्गत पालखेड येथील शेतकरी रामदास पुंजा शिंदे यांच्या गट नं. २३३ मधील बाधीत द्राक्षवेलींची संख्या कळवून नुकसान झालेल्या द्राक्षवेलींचे मूल्यांकन करून देण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मूल्यांकन अहवाल पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेड या संस्थेला सादर केला. या अहवालानुसार शेतकरी रामदास शिंदे यांना एकूण नुकसानभरपाईची रक्कम ४० लाख ७९ हजार ४३ रुपये अदा करण्यात आली. प्रत्यक्षात ही नुकसानभरपाई तत्कालीन तालुका कृषी अधिकाºयांनी सरसकट ३० टक्के जादाची दिल्याची तक्रार केल्यानंतर त्याची चौकशी होऊन तक्रारीत तथ्य आढळल्याचे उघड झाले. म्हणजेच जर कोणी तक्रार केली नसती तर ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ यानुसार लाखोंची रक्कम कोणाच्या घशात गेली असती, हे सांगायला नको. बरे असे करत असताना अन्य शेतकºयांच्या बाबतीत वेगळा नियम का आणि कशासाठी याचे उत्तर आपोआपच ‘भेटी-गाठी’ संस्कृतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच एका शेतकºयाच्या फळझाड मूल्यांकनातही १८०० द्राक्ष वेलींच्या झाडांसाठी चक्क ८३ लाखांची नुकसानभरपाई देण्याचा उदारपणा कृषी विभागाने केला आहे. अर्थातच ही सर्व एकमेकांची मिलीभगत असल्याशिवाय शक्यच होणार नाही, असे तक्रारकर्त्या शेतकºयांचे म्हणणे आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या तत्कालीन अधिकाºयांनी पालखेड येथील प्रकरणाची तक्रारीनुसार चौकशी केली असता, त्यात एक-दोन नव्हे तर चार चार अधिकारी दोषी असल्याचे आढळून आले आहे. या चारही अधिकाºयांकडून लाखोंची वसुली आता करण्यात येणार आहे, हा भाग अलाहिदा. तत्कालीन चौकशी अधिकाºयांवरही या प्रकरणात दडपण आल्याने त्यांनी आपल्याकडील चौकशीचे काम काढून घेण्यासाठी अर्ज करावेत, यातच या साटेलोटे असलेल्या लॉबीचा दबाव उघड होतो. बरे तर फळझाडांचे मूल्यांकन करताना शासन नियमांकडे सोयिस्कररीत्या काणाडोळा करूनच हे मूल्यांकन झाल्याचे नंतर चौकशीत आढळून आल्यानेच ३० टक्के जादाचे मूल्यांकन केल्याचा ठपका ठेवत त्यापोटी लाखोंची वसुली या चार कृषी अधिकाºयांकडून दाखविण्यात आली आहे. त्यात तत्कालीन तालुका कृषी अधिकारी एस. एस. गावित, के. के. ढेपे, उपविभागीय अधिकारी हेमंत काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे या चार अधिकाºयांचा समावेश आहे. या चारही अधिकाºयांकडून तब्बल २६ लाख १९ हजार ७५७ रुपये जादा दिल्याचा ठपका ठेवत ती वसुली या चौघा अधिकाºयांकडून करण्यात येणार आहे. (क्रमश:)