शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

Assembly Election 2022: 5 राज्यांची सद्यस्थिती, कोणत्या राज्यात किती जागा अन् कुणाचं सरकार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 18:18 IST

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे

नवी दिल्ली - देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 7 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात सात टप्प्यात मतदान होईल. तर, गोवा आणि पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 10 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ज्या 5 राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, तेथील सद्यस्थितीचा राजकीय आढावा आपण घेऊयात. 

उत्तर प्रदेशनिवडणुका घोषित झालेल्या 5 राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी निवडणूक होत असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 202 जागांवर विजय मिळवावा लागेल. युपीचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून भाजपाने 303 जागांसह विजय मिळवला आहे. तर, समजावादी पक्ष 49 जागांसह प्रमुख विरोधी पक्ष आहे. 

पंजाबपंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होत असून सध्या येथे काँग्रेसचे सरकार आहे. चरणजीत सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने 77 जागांसह बहुमत सिद्ध केलं आहे. तर, 17 जागांसह आम आदमी पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. 

उत्तराखंडउत्तराखंड 70 जागांसाठी निवडणूक होत असून 36 जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठता येईल. सध्या येथे भाजपचे सरकार असून पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्री आहेत. भाजपने 53 जागांसह बहुमत सिद्ध केले आहे. तर, 9 जागांसह काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. 

गोवागोव्यात 40 जागांसाठी निवडणूक होते असून राजकीय पक्षाला 21 जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध करावे लागेल. सध्या, गोव्यात भाजपचे सरकार असून प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत. 2017 मध्ये भाजपने गोव्यात 25 जागा जिंकल्या आहेत. 

मणिपूर मणिपूरमध्ये सध्या भाजप आघाडीचं सरकार असून भाजपने 29 जागा जिंकल्या होत्या. सध्या येथे भाजप नेते एन.बीरेनसिंह हे मुख्यमंत्री आहेत. तर, 15 जागा जिंकत काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्षपद मिळवले आहे. येथे नॅशनल पिपल्स फ्रंट आणि नॅशनल पिपल्स पार्टीनेही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. 

दरम्यान, एकूणच निवडणूक जाहीर झालेल्या 5 राज्यांपैकी 4 राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि भाजपचे सरकार आहे. तर, केवळ पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आणि मुख्यमंत्री आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री