शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

अस्वली, पाडळी, घोटी स्थानके गजबजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 6:13 PM

इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वेस्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कधी काळी केवळ पॅसेंजर आणि शटल या केवळ दोन गाड्या थांबणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, पाडळी, अस्वली या स्थानकाचे आता रूप पालटू लागले आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या अस्वली, पाडळी या रेल्वेस्थानकावर काही दिवसांतच कल्याण ते नाशिक ही लोकलसेवा प्रवाशांसाठी दाखल होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.कधी काळी केवळ पॅसेंजर आणि शटल या केवळ दोन गाड्या थांबणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील घोटी, पाडळी, अस्वली या स्थानकाचे आता रूप पालटू लागले आहे. लवकरच या मार्गावर कल्याण-नाशिक लोकल सेवेला सुरुवात होणार आहे. ही लोकल येत्या काही दिवसात चालू होणार असल्याने या तिन्ही स्थानकावर विविध कामे करण्याला वेग आला आहे. यापूर्वी केवळ नामधारी ठरलेली ही स्थानके येत्या काही काळात उद्घोषणा व प्रवाशाच्या गर्दीने गजबजून जाणार आहे.इगतपुरी स्थानकवगळता तालुक्यात घोटी, पाडळी, अस्वली ही स्थानके आहेत. ही स्थानके भुसावळ विभागांतर्गत येत असल्याने अनेक वर्षांपासून उपेक्षितच होती. या स्थानकावर केवळ मनमाड इगतपुरी शटल आणि भुसावळ मुंबई-पॅसेंजर या दोनच गाड्या थांबत असल्याने प्रवाशांनी या स्थानकाकडे पाठ फिरवली होती.दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कल्याण-नाशिक लोकल सेवेची मागणी यावर्षी पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने या स्थाकाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लोकल सेवा सुरू होण्याच्या पूर्वी इगतपुरी, घोटी, पाडळी आणि अस्वली स्थानकाचा कायापालट करण्यात येत असून, यात घोटी स्थानकात पादचारी पूल आणि नवीन प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येत आहे तर पाडळी स्थानकावर नवीन तिकीटघर बांधण्यात येणार आहे. या स्थानकावरही पादचारी पूल बांधण्यात येणार असून, त्या कामाची सुरूवात करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे