सक्तीच्या कर्जवसुली स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:09 IST2021-06-30T16:08:25+5:302021-06-30T16:09:08+5:30
सायखेडा : दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावाने व नैसर्गिक आपत्तीमुळे निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकत आहे. त्यातच भर म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली चालविली आहे. या सक्तीच्या कर्जवसुलीला स्थगिती मिळविण्यासाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घालत निवेदन दिले.

नाशिक जिल्हा बँकेची कर्जवसुली तत्काळ स्थगित करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देताना निफाडचे माजी आमदार अनिल कदम समवेत गोकुळ गीते, अमोल भालेराव.
सायखेडा : दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावाने व नैसर्गिक आपत्तीमुळे निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकत आहे. त्यातच भर म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली चालविली आहे. या सक्तीच्या कर्जवसुलीला स्थगिती मिळविण्यासाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन साकडे घालत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडल्याने हलाखीत जीवन जगत आहे. अवकाळी पावसामुळेही ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरीही जिल्हा बँकेकडून सक्तीने कर्जवसुली मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून वसुलीसाठी स्थगिती न दिल्यास नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढू शकतात, अशी भीतीही कदम यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली आहे. यावेळी करे यांनी जिल्हा बँकेकडून माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कदम यांना दिले. तसेच निफाड तालुक्यातील चोवीस गावांचा पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलजीवन मिशन कृती आराखड्यात समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सहकार्य केल्याबद्दल अनिल कदम यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी बाजार समिती माजी संचालक गोकुळ गीते, बाळासाहेब सरोदे, अमोल भालेराव आदी उपस्थित होते.