शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी पवारने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:39 PM

सिन्नर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाद्वारे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात झाली.

ठळक मुद्देनिकाल जाहीर : सिन्नर महाविद्यालयात राज्यस्तरीय स्पर्धा रंगल्या

सिन्नर : येथील सिन्नर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विभागाद्वारे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात झाली.या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुल्लेकर, मविप्र समाज संस्थेचे सिन्नर तालुका संचालक हेमंत वाजे, प्राचार्य डॉ. दिलीप बी. शिंदे, परीक्षक डॉ. दत्तात्रेय गंधारे, डॉ. भास्कर ढोके, प्रा. विद्या कुलकर्णी, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, डॉ. डी. एम. जाधव, शकुंतला गायकवाड, डॉ. द. ल. फलके, डॉ. सुरेखा पाटील, जयश्री बागुल, प्रा. बी. यू. पवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक आणि साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुल्लेकर यांनी सहभागींना मार्गदर्शन केले. हेमंत वाजे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. द. ल. फलके यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून वैचारिक मंथन होऊन चांगला वक्ता निर्माण व्हावा या उद्देशाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन असल्याचे स्पष्ट केले. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. दत्तात्रय गंधारे, डॉ. भास्कर ढोके, प्रा. विद्या कुलकर्णी यांनी काम पाहिले. मामासाहेब दांडेकर यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, लोकशाहीतील मूल्य, बदलती शैक्षणिक धोरणे व विद्यार्थी, माध्यमांची नीतिशास्त्र, जागतिक आर्थिक मंदी व भारत आदी विषयांवर स्पर्धकांनी मते व्यक्त केली. या वक्तृत्व स्पर्धेत या विषयावर एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.सूत्रसंचालन जयश्री बागुल यांनी केले, तर आभार प्रा. बी. यू. पवार यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील स्पर्धक व सिन्नर महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.स्पर्धेचा निकालप्रथम क्रमांक : अश्विनी झुंबर पवार (पाच हजार रुपये व स्मृतिचिन्ह), द्वितीय क्रमांक - सुशील शशिकांत उशिरे (३ हजार रुपये व स्मृतिचिन्ह), तृतीय क्र मांक- मिथुन दत्तात्रेय माने ( दोन हजार रुपये व स्मृतिचिन्ह), उत्तेजनार्थ- महेश गणेश अहिरे (एक हजार रुपये). उत्स्फूर्त वक्ता : अमोल मिलिंद उगले (एक हजार रुपये) यांनी यश मिळविले. समारोप समारंभात यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण