वाढदिवसाचा खर्च टाळून आश्रमशाळेस मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:44 IST2018-10-30T17:44:03+5:302018-10-30T17:44:28+5:30
सिन्नर : तालुक्यातील रामनगर येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेला बाजीराव देवराम डुंबरे यांनी नातवाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून मदत केली.

वाढदिवसाचा खर्च टाळून आश्रमशाळेस मदत
सिन्नर : तालुक्यातील रामनगर येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेला बाजीराव देवराम डुंबरे यांनी नातवाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून मदत केली.
राजवर्धन डुंबरे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आश्रमशाळेत सदरचा उपक्रम राबविण्यात आला. चार ते बारा वर्षे वयोगटातील विद्यार्थी उपस्थित होते. शाळेला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे डुंबरे यांनी सांगितले. चिमुकल्यांना खाऊ वाटप करण्यात आले. आश्रम शाळेची सध्याची गरज पाहता मुलांना लागणारे स्टील भोजन पात्र शाळेस भेट देण्यात आले. चिमुकले आनंदाने भारावून गेले होते. साहस ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीने आगामी काळात चिमुकल्यांना नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते देवेश उगले यांनी सांगितले. यावेळी सुदर्शन डुंबरे राजवर्धन डुंबरे, गौरव दवंगे, नितीन साळुंके व शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.