खरेदी-विक्री संघ चेअरमनपदी आशा वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:18 IST2021-09-15T04:18:06+5:302021-09-15T04:18:06+5:30

येवला : तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी आशा वैद्य तर व्हाईस चेअरमनपदी मीरा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

Asha Vaidya as the chairman of the buying and selling team | खरेदी-विक्री संघ चेअरमनपदी आशा वैद्य

खरेदी-विक्री संघ चेअरमनपदी आशा वैद्य

येवला : तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी आशा वैद्य तर व्हाईस चेअरमनपदी मीरा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

संघाच्या सभागृहात संचालक मंडळाच्या विशेष सभेत सदर निवडी करण्यात आल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन पवार यांनी मनोगत व्यक्त केले. आभार व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी केले.

याप्रसंगी आमदार किशोर दराडे, ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, माजी सभापती संभाजी पवार, चंद्रकांत पाडवी, डॉ. सुधीर जाधव, नंदकिशोर अट्टल, बबन साळवे, मंगेश भगत, रांजेद्र गायकवाड, त्र्यंबक सोमासे, शिवाजी धनगे, दगडू टर्ले, जनार्दन खिल्लारे, अनिल सोनवणे, दिनेश आव्हाड, भास्कर येवले, नाना शेळके, संतोष लभडे , जगन्नाथ बोराडे, रघुनाथ पानसरे, सुरेश कदम, भागुजी महाले, दामू पवार, दत्तात्रय वैद्य, रामदास पवार आदी उपस्थित होते. (१३ आशा वैद्य)

130921\563813nsk_42_13092021_13.jpg

आशा वैद्य.

Web Title: Asha Vaidya as the chairman of the buying and selling team