शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आशा स्वयंसेविका जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:32 IST

आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी येत्या ३ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. २६) बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांजली काळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले.

सटाणा : आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी येत्या ३ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. २६) बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांजली काळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले.महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने गेल्या काही वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी लढा उभारला आहे. यावेळी कृती समितीचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांजली काळे, सुरेखा खैरनार, स्नेहल लोखंडे, लता बच्छाव, अरुणा सोनले, सोनल जगताप आदी उपस्थित होते.या आहेत मागण्या ......आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचार्याचा दर्जा देण्यात यावा, दि. १६ सप्टेंबर २०१९ च्या शासकीय आदेशानुसार आशांच्या मोबदल्यात दरमहा दोन हजार रु पये वाढ केली आहे . सदरील आदेशाची पूर्वलक्षीप्रभावाने अंमलबजावणी करून त्याव्यतिरिक्त आशा स्वयंसेविकांना दरमहा पाच हजार रु पये ठरावीक वेतन द्यावे.तसेच कामावर आधारित मोबदल्याचे दर फार जुने आहेत त्यात दुपटीने वाढ करावी, दि. १६ सप्टेंबर २०१९ चा शासकीय आदेश गटप्रवर्तकांना ही लागू करून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांची अंमलबजावणी करावी गटप्रवर्तकांना सध्या रु. ७५०० ते ८२५० टि.ए.डी.ए. मिळतो. त्यात वाढ करून त्या शिवाय त्यांना दरमहा दहा हजार रुपये ठरावीक वेतन द्यावी, ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना लॉकडाऊनच्या काळात काम केल्याबाबत तीन मिहन्यांसाठी दरमहा एक हजार रु पये प्रोत्साहनपर भत्ता मिळतो. गटप्रवर्तकांना तीन मिहन्यांसाठी दरमहा पाचशे रु पये मिळतो असा भेदभाव का? गटप्रवर्तकांना सुद्धा आशा स्वयंसेविका इतका प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविकांना काहीच भत्ता दिला जात नाही. तेव्हा त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा.

टॅग्स :GovernmentसरकारWomenमहिला