आशा स्वयंसेविका जाणार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:32 IST2020-06-26T22:29:55+5:302020-06-27T01:32:08+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी येत्या ३ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. २६) बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांजली काळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले.

बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना निवेदन देताना आशा कर्मचारी.
सटाणा : आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी येत्या ३ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. २६) बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांजली काळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले.
महाराष्ट्र राज्य आशा, गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने गेल्या काही वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी लढा उभारला आहे. यावेळी कृती समितीचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांजली काळे, सुरेखा खैरनार, स्नेहल लोखंडे, लता बच्छाव, अरुणा सोनले, सोनल जगताप आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या ......
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचार्याचा दर्जा देण्यात यावा, दि. १६ सप्टेंबर २०१९ च्या शासकीय आदेशानुसार आशांच्या मोबदल्यात दरमहा दोन हजार रु पये वाढ केली आहे . सदरील आदेशाची पूर्वलक्षीप्रभावाने अंमलबजावणी करून त्याव्यतिरिक्त आशा स्वयंसेविकांना दरमहा पाच हजार रु पये ठरावीक वेतन द्यावे.तसेच कामावर आधारित मोबदल्याचे दर फार जुने आहेत त्यात दुपटीने वाढ करावी, दि. १६ सप्टेंबर २०१९ चा शासकीय आदेश गटप्रवर्तकांना ही लागू करून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांची अंमलबजावणी करावी गटप्रवर्तकांना सध्या रु. ७५०० ते ८२५० टि.ए.डी.ए. मिळतो. त्यात वाढ करून त्या शिवाय त्यांना दरमहा दहा हजार रुपये ठरावीक वेतन द्यावी, ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना लॉकडाऊनच्या काळात काम केल्याबाबत तीन मिहन्यांसाठी दरमहा एक हजार रु पये प्रोत्साहनपर भत्ता मिळतो. गटप्रवर्तकांना तीन मिहन्यांसाठी दरमहा पाचशे रु पये मिळतो असा भेदभाव का? गटप्रवर्तकांना सुद्धा आशा स्वयंसेविका इतका प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील आशा स्वयंसेविकांना काहीच भत्ता दिला जात नाही. तेव्हा त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा.