आशा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:21 IST2020-07-27T20:39:59+5:302020-07-27T23:21:05+5:30

नांदगाव : तालुक्यातील मळगाव येथील आशा प्रवर्तकाला उपसरपंचाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.२७)काम बंद आंदोलन करीत दोषींवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून अटक करावी या मागणीसाठी तालुका पंचायत समितीपुढे काही काळ धरणे आंदोलन केले.

Asha employees strike off work | आशा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

नांदगाव तालुका पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करतांना आशा कर्मचारी.

ठळक मुद्देमळगावच्या उपसरपंचाने केलेल्या मारहाणीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : तालुक्यातील मळगाव येथील आशा प्रवर्तकाला उपसरपंचाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.२७)काम बंद आंदोलन करीत दोषींवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून अटक करावी या मागणीसाठी तालुका पंचायत समितीपुढे काही काळ धरणे आंदोलन केले. दरम्यान या प्रकरणी प्रशासनाने दोषींवर कारवाई केली नाही तर तालुकास्तरावर असलेल्या या आंदोलनाची व्याप्ती वाढून ती जिल्हास्तरीय करण्यात येईल असा इशारा आयटक नेते राजू देसले यांनी दिला.
नांदगाव निफाड तालुक्यात आशा कर्मचाºयांनी काम बंद पुकारल्याने तालुका पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करणाºया आशा कर्मचाºयांची समजूत काढण्यासाठी गटविकास अधिकारी गणेश चौधरी स्वत: बाहेर आले व त्यांनी निवेदन स्वीकारले जोपर्यंत अटक होत नाही. तोवर कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संतप्त कर्मचाºयांनी दिला. पोलिसांनी कारवाई केली असली. तरी जुजबी स्वरूपाची असल्याचे या कर्मचाºयांचे म्हणणे होते. एखाद्या महिलेला अशी मारहाण करणे सर्वस्वी चुकीचे असल्याने कठोर कारवाई व्हावी यासाठी या महिला कर्मचारी आग्रही होत्या तहसीलदार उदय कुलकर्णी, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांना निवेदन सादर करण्यात आले.
देसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात विजय दराडे, दीपाली कदम, चित्रा तांबोळी रोहिणी आहेर, शितल आहेर, इंदुमती गायकवाड, शारदा निकम, योगिता देवकर, योगिता कवडे, संध्या व्यवहारे, सविता शिंदे, नलिनी काकळीज, सविता बोरसे, छाया सोनवणे, संवर्णा देवरे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Asha employees strike off work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.