नाशिकच्या आर्यन शुक्लने जिंकले कांस्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:20 PM2020-08-22T22:20:19+5:302020-08-23T00:20:46+5:30

नाशिक : माइंड स्पोर्ट आॅलम्पियाड अंतर्गत भरविण्यात आलेल्या मेंटल कॅलक्युलेशन वर्र्ल्ड चॅम्पियनशिप २०२० या स्पर्धेत नाशिकच्या अवघ्या दहा वर्षाच्या आर्यन शुक्लने भारतासाठी कांस्यपदक पटकावले आहे. यंदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगातील सर्वात्तम तीस खेळाडू सहभागी झाले होते.

Aryan Shukla of Nashik won the bronze medal | नाशिकच्या आर्यन शुक्लने जिंकले कांस्यपदक

नाशिकच्या आर्यन शुक्लने जिंकले कांस्यपदक

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी लंडनमध्ये होणाऱ्या या स्पर्धा यंदा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या.

नाशिक : माइंड स्पोर्ट आॅलम्पियाड अंतर्गत भरविण्यात आलेल्या मेंटल कॅलक्युलेशन वर्र्ल्ड चॅम्पियनशिप २०२० या स्पर्धेत नाशिकच्या अवघ्या दहा वर्षाच्या आर्यन शुक्लने भारतासाठी कांस्यपदक पटकावले आहे. यंदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगातील सर्वात्तम तीस खेळाडू सहभागी झाले होते. कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी लंडनमध्ये होणाऱ्या या स्पर्धा यंदा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. भारतातील जिनियसकिड इंडिया संस्थेच्या नेतृत्वाखाली सहा खेळाडू सहभागी झाले होते. अवघ्या काही सेकंदात गणिताचे कठीण प्रश्न सोडविणे तसेच बारा आकडी संख्येचे घनमुळ, वर्गमुळ, कोणत्याही तारखेचा वार सांगणे, मोठ्या संख्येचे गुणकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी करणे अशा प्रकारच्या प्रश्नांचा त्यात समावेश होता. आर्यनला संस्थेचे प्रमुख युझेबियस नोरोन्हा, नाशिकचे नितीन जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Aryan Shukla of Nashik won the bronze medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.