घोटीच्या उपसरपंचपदी अरुणा जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 00:25 IST2021-07-15T22:43:41+5:302021-07-16T00:25:27+5:30
घोटी : घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी अरुणा जाधव यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच रामदास भोर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड करण्यात आली.

घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी अरुणा जाधव यांच्या निवड प्रसंगी सचिन गोणके, रामदास भोर, स्वाती कडू, सुनील जाधव, संतोष दगडे, रामदास शेलार, हिरामण कडू, गणेश काळे, समाधान जाधव आदी
घोटी : घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी अरुणा जाधव यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच रामदास भोर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड करण्यात आली.
घोटी ग्रामपालिकेच्या सभागृहात उपसरपंच निवडीसाठी गुरुवारी (दि.१५) सदस्य मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच सचिन गोणके यांनी काम पाहिले. उपसरपंच निवड प्रक्रियेत अरुणा विकास जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी काम पाहीले. या प्रसंगी ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, संजय आरोटे, श्रीकांत काळे, संजय जाधव, रवींद्र तारडे, भास्कर जाखेरे, गणेश गोडे, स्वाती कडू, रुपाली रुपवते, वैशाली गोसावी, मंजुळा नागरे, अर्चना घाणे, कोंड्याबाई बोटे, घोटकर आदी सदस्य उपस्थित होते.