प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरुण पवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:06 IST2020-08-28T22:20:25+5:302020-08-29T00:06:51+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील कसमादे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरुण पवार तर उपाध्यक्षपदी किशोर खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कसमादे प्राथमिक शिक्षक पतंसंस्थेच्या अध्यक्षपदी अरुण पवार, तर उपाध्यक्षपदी किशोर खैरनारयांची निवड झाल्याबद्ल सत्कार करताना आर. के. खैरनार, विनायक ठोंबरे, दीपक सोनवणे, संदीप पाटील, दादा पाटील आदी.
औंदाणे : बागलाण तालुक्यातील कसमादे प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अरुण पवार तर उपाध्यक्षपदी किशोर खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी भंडागे यांच्या अध्यक्षतेखााली संचालकांची बैठक पार पडली. यावेळी अरुण पवार व खैरनार यांचा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आर. के. खैरनार, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक ठोंबरे, राज्य उपाधक्ष रवींद्र थोरात, मालेगाव शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, एनडीपीटीचे संंचालक दीपक सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक गोविंद देवरे, किरण शिंदे, नवनाथ जाधव, कैलास बच्छाव, अरुण पवार, तुकाराम पाटील, सुधीर इंगळे, दीपक जगताप, रवंींद्र थोरात, दादा पाटील, विलास पवार, शरद भामरे, विजय आहिरे, बाबुलाल सोनवणे, योगेश शेवाळे, विलास चव्हाण, सुनील देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.