सिंगापूर संगीत स्पर्धेत नाशिकचे कलावंत
By Admin | Updated: December 25, 2014 23:30 IST2014-12-25T23:16:53+5:302014-12-25T23:30:00+5:30
सिंगापूर संगीत स्पर्धेत नाशिकचे कलावंत

सिंगापूर संगीत स्पर्धेत नाशिकचे कलावंत
नाशिक : अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे मलेशिया-सिंगापूर येथे ३० रोजी होणाऱ्या चौथ्या कल्चरल आॅलिम्पियाडसाठी नाशिकच्या कलावंतांची निवड झाली आहे.
पुणे येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत नाशिकच्या उस्ताद शाहीर परवेझ संगीत गुरुकुलच्या सदस्यांनी भाग घेतला होता. त्यात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. आता सिंगापूर येथे होणाऱ्या स्पर्धेत हे कलावंत सतारवादन करणार आहेत. सौ. मोहिनी कुलकर्णी, अंजली नांदूरकर व राधिका गोडबोले या स्पर्धेत सतारवादन करणार असून, त्यांना गौरव तांबे तबलासंगत करणार आहेत.