युद्धनिती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:41 PM2019-10-10T18:41:01+5:302019-10-10T18:41:06+5:30

देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘रुद्रनाद’ या ऐतिहासिक संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील काही वर्षांमध्ये सैन्यदलात नवनवीन पद्धतीने दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या तोफांचा समावेश करण्यात आला आहे.

Artillery School's contribution to combat training | युद्धनिती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलचे योगदान

युद्धनिती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलचे योगदान

Next
ठळक मुद्देतोफखान्याला अधिकाधिक दक्ष बनविण्यात देवळाली तोफखाना स्कूल आधारभूमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देवळाली तोफखाना स्कूलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनितीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना जोरदारपणे करतील, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.


देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘रुद्रनाद’ या ऐतिहासिक संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील काही वर्षांमध्ये सैन्यदलात नवनवीन पद्धतीने दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या तोफांचा समावेश करण्यात आला आहे. यात भारतीय उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. काकूल येथे सुरू झालेला तोफखाना स्कूलचा प्रवास अतिशय गौरवपूर्ण आहे. या तोफखाना केंद्रातील सैनिकांप्रती संपूर्ण देशाला अभिमान आहे. देशाच्या तोफखान्याला अधिकाधिक दक्ष बनविण्यात देवळाली तोफखाना स्कूल आधारभूमी आहे. तोफखाना स्कूलमधील अधिकाऱ्यांची प्रशिक्षणाप्रती असलेली निष्ठा प्रशंसनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. देवळाली तोफखाना स्कूलचा नावलौकिक ‘रुद्रनाद’प्रमाणे गर्जत राहील आणि देशाकडे वाईट नजरेने बघणा-या शत्रुंना भयभीत करील, असे सांगून देशाला प्रत्येक धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शक्तिशाली सैन्यदल तयार करण्यात देवळाली तोफखाना केंद्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे गौरवोद्गारही राष्ट्रपतींनी काढले. प्रारंभी राष्टÑपती कोविंद यांच्या हस्ते देवळाली तोफखाना स्कूलच्या ऐतिहासिक कामगिरीची माहिती देणाºया ‘रुद्रनाद’ म्युझियमचे उद््घाटन करण्यात आले. त्यानंतर शतकमहोत्सवी ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. ‘स्कूल आॅफ आर्टिलरी’ या पुस्तकाचे प्रकाशन लष्करप्रमुख जनरल बिपीनकुमार रावत यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाची पहिली प्रत रावत यांनी राष्टÑपती कोविंद व राज्यपाल कोश्यारी यांना भेट दिली. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, मेजर जनरल संजय शर्मा, बिग्रेडियर जे. बी. सिंग, कर्नल ए. के. सिंग, कर्नल रंजन प्रभा, कर्नल नवनीत सिंग, तोफखाना स्कूलचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Artillery School's contribution to combat training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.