शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

आर्टिलरी स्कूल : देवळाली गोळीबार मैदानावर तोफांचा ‘सर्वत्र प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 4:51 PM

या युध्दजन्य प्रात्याक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिध्द करत संभाव्य काळात कोणत्याही युध्दाशी मुकाबला करण्यास आधुनिक तोफा घेऊन भारतीय सैन्यदल सज्ज असल्याचा अप्रत्यक्षपणे संदेश दिला.

ठळक मुद्देहोवित्झर आणि वज्रकडून तितक्याच ताकदीने बॉम्बहल्ला अत्याधुनिक ‘स्वाती’ रडार सिस्टिमचेही प्रदर्शन

नाशिक : येथील देवळाली स्कूल आफ आर्टीलरीच्या वार्षिक ‘तोपची’ या युधजन्य प्रात्याक्षिकांच्या निमित्ताने भारतीय सैन्यदलाच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या गोळीबार मैदानावर मोर्टारपासून थेट के-९वज्रपर्यंत सर्वच तोफा मोठ्या ताकदीने मंगळवारी (दि.१२) धडाडल्या. भारतीय सैन्याचा पाठीचा कणा मानला जाणारा व युध्दात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याच्या आधुनिक वाटचालीची गतिमानता बघून शत्रू राष्ट्रच्याही उरात धडकी भरली असावी.अचूक लक्ष्यभेद, काही सेकं दात एकापेक्षा अधिक बॉम्ब डागण्याची क्षमता असलेल्या १३०० एमएम, १०५ एम.एम, उखळी मारा करणारी हलकी तोफ, कारगिल युध्दात शत्रूला सळो की पळो करून सोडणारी १५५ एम.एम बोफोर्स, १३० एम.एम सोल्टम, होवित्झर एम-७७७ आणि के-९ वज्र या अत्याधुनिक तोफांसह मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरच्या सहाय्याने प्रशिक्षित जवानांनी दिलेले लक्ष्य निर्धारित मिनिटांत अचूकपणे भेदत तोफखान्याची ताकद दाखवून दिली. होवित्झरने दागलेले पाच बॉम्ब आणि वज्रकडून तितक्याच ताकदीने झालेला बॉम्बहल्ला शत्रूला निश्चित धडकी भरविणारा असाच होता. कारगिलच्या युध्दात पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारण्यास यशस्वी ठरलेल्या बोफोर्स प्रकारच्या सहा तोफांनी एकत्रितपणे प्रत्येकी दोन बॉम्ब दागून लक्ष्य उद्ध्वस्त केले. या युध्दजन्य प्रात्याक्षिकांद्वारे तोफखान्याच्या जवानांनी स्वत:ला पुन्हा सिध्द करत संभाव्य काळात कोणत्याही युध्दाशी मुकाबला करण्यास आधुनिक तोफा घेऊन भारतीय सैन्यदल सज्ज असल्याचा अप्रत्यक्षपणे संदेश दिला.या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लेफ्टनंट जनरल वाय.वी. के मोहन अतिविशीष्ट सेवा मेडल, आर्टिलरी स्कूल चे कमान्डंट लेफ्टनंट जनरल रणबिरसिंग सलारिया यांच्यासह भारतीय वायूसेनेचे अधिकारी जवान, विशेष निमंत्रित नेपाळ सैन्याचे अधिकारी व जवानांसह पोलीस अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.या सोहळ्यादरम्यान युध्दभूमीवर जशी तोफांची भूमिका महत्त्वाची ठरते तसे लढाऊ हेलिकॉप्टरची भूमिकाही तितकीच आवश्यक असते, याचे प्रात्याक्षिकदेखील आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या वैमानिकांनी सादर केले. चेतक, ध्रूव, रूद्र या लढाऊ हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जवानांनी चित्तथरारक कसरती सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. यावेळी हत्यारांचा शोध घेण-या अत्याधुनिक ‘स्वाती’ रडार सिस्टिमचेही प्रदर्शन करण्यात आले. तोफखान्याकडे असलेल्या अत्याधुनिक साधनसामुग्री बघता भारतीय सैन्यदलाने आधुनिकतेच्या वाटेवर स्वत:ला अधिकाधिक वेगवाने ठेवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवल्याचे दिसून येते.--इन्फो--गोळीबार मैदानाच्या परिसरातील अशी होती ‘लक्ष्य’१) कोनहिल टॉप२) ओपन पॅच३) बहुला-१४) बहुला -१ सेंटर५) हर्बरा६) व्हाईट टेम्पल एरिया७) डायमंड८) रिक्टॅन्गल९) हम्प१० संगमाथा ही सर्व ‘लक्ष्य’ तोफांनी अचूकपणे भेदली. होवित्झर, वज्र या तोफा सोहळ्याच्या आकर्षण ठरल्या.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागNashikनाशिकIndian Armyभारतीय लष्कर