शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव शहरात कृत्रिम पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:42 IST

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

नांदगाव : नांदगाव शहराचे पाण्याचे आवर्तन वाढत्या गरमी बरोबरच अधिकाधिक लांबणीवर पडत असल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी गाड्या व पिण्याचे पाणी पुरवणारे जार वाहून नेणाºया गाड्या गल्लोगल्ली धावतांना दिसून येत आहेत. गिरणा धरणाच्या योजनेतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणीमुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.शहरास मुख्य पाणी पुरवठा गिरणा धरण प्रादेशिक योजनेतून होत असतो. थकबाकीचे कारण पुढे करून वारंवार पाणी पुरवठा तोडण्याची धमकी देणार्या जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची ८५ लाख रु पयांची थकबाकी चुकती करून जिल्हा परिषदेचे ऋण फेडल्याने यापुढे पाण्याचे आवर्तनं वेळेवर येईल अशी आशा नांदगाव करांच्या मनात निर्माण झाली होती.सुरवातीचे काही आवर्तन त्याप्रमाणे आले देखील. पण महिना दीड महिन्यात येरे माझ्या मागल्याची पुनरावृत्ती होत गेली. आठ दिवसांवर आलेला पाणी पुरवठा पंधरा ते वीस दिवसांवर गेला आहे. घरातले पाणी संपले कि... केव्हा येणार पाणी.... अशी विचारणा सुरु होते. पाणी पुरवठा करणाºया यंत्रणेकडे त्याचे उत्तर नसते व आशेच्या मृगजळामागे नांदगावकर धावत असतात.गिरणा धरणात सुमारे ६००० द.ल.घ.फु जलसाठा आहे. त्यावर अवलंबून पाणी पुरवठा योजनांसाठी तो पुढील दीड ते दोन वर्ष पुरेल एवढा असल्याची माहिती आहे. मात्र जलवाहिनी फुटणे, पंप नादुरुस्त होणे, कर्मचारी गैरहजेरीमुळे वेळापत्रक विस्कळीत होणे अशा अनेक कारणांमुळे पाणी पुरवठ्याची अक्षरश: वाट लागली आहे. तालुक्यात एक दोन ठिकाणचा अपवाद वगळता कुठे हि पृष्ठभागावर पाणी नाही. विहिरी कोरड्या पडल्या असून ४५० ते ६०० फुट खोलीवरचे पाणी वापरायला व नाईलाजाने अथवा नकळत पिण्यात आल्याने नागरिक आजारी पडत आहेत. लिंबुपाणी, सरबते बर्फाचे गोळे यांचा सिझन आहे. त्यात कोणते पाणी असते? असेच राहिले तर नजीकच्या काळात किडनी, यकृत व कर्करोगाने आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल असे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त करत आहेत.सद्यस्थितीत सुरु असलेल्या योजनेचे आयुष्य संपले आहे नवीन योजनेच्या सवंग घोषणा केल्या जातात. परंतु पावले उचलली जात नाहीत. पोहोºयात पाणी असून ही नांदगावकरांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण भटकणे आले आहे.