अक्कलकोटच्या स्वामी समर्थ पादुकांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:59 IST2018-05-06T00:59:43+5:302018-05-06T00:59:43+5:30
नाशिकरोड : अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे शनिवारी जेलरोड परिसरात मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.

अक्कलकोटच्या स्वामी समर्थ पादुकांचे आगमन
नाशिकरोड : अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे शनिवारी जेलरोड परिसरात मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखीचे शनिवारी सकाळी जेलरोड भीमनगर येथे स्वागत करण्यात आले. तेथून जेलरोड शिवाजीनगर समाज मंदिरापर्यंत पादुका पालखीची वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होऊन रात्री ८ वाजता दिवसभर भाविक, महिला आदींनी स्वामींच्या पादुका व पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी विनोद कुलकर्णी, अतुल संत, उमेश साडे, वसंत काचरणे, सचिन सहाणे, पुरुषोत्तम कुलकर्णी आदी सेवेकऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. रविवारी सकाळी जेलरोड येथून पादुका पालखीचे प्रस्थान इंदिरानगर येथील नागरे यांच्याकडे होणार आहे.