लासलगावी लाल कांद्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:19 IST2021-03-18T20:33:22+5:302021-03-19T01:19:56+5:30
लासलगाव : येथील बाजार समिती आवारात गुरुवारी (दि.१८) लाल कांद्याची आवक वाढून बाजारभाव किमान ४०० ते कमाल १२४१ व सरासरी ११०० रुपये राहिले.

लासलगावी लाल कांद्याची आवक
ठळक मुद्देसरासरी १०४० रूपये भाव मिळाला
लासलगाव : येथील बाजार समिती आवारात गुरुवारी (दि.१८) लाल कांद्याची आवक वाढून बाजारभाव किमान ४०० ते कमाल १२४१ व सरासरी ११०० रुपये राहिले.
उन्हाळ कांद्यालाही किमान ६०० ते कमाल १२७१ रूपये आणि सरासरी १०४० रूपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत गुरुवारी १६६१ वाहनांतील कांदा लिलाव झाले पण बाजारात भाव स्थिर राहिले. लाल कांद्याची आवक वाढली असून १४६९ वाहनांतून अंदाजे २५ हजार ९१८ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला.