राज ठाकरे यांचे नाशकात आगमन
By Suyog.joshi | Updated: March 7, 2024 20:28 IST2024-03-07T20:27:24+5:302024-03-07T20:28:36+5:30
पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

राज ठाकरे यांचे नाशकात आगमन
सुयोग जोशी. नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सायंकाळी उशीरा शहरात आगमन झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
मनसेचे वर्धानपन दिनाची गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. पक्षाला पुन्हा गतवैभव मिळ्वून देण्याच्या दुष्टीने या वर्धापन दिनाकडे पाहिले जात आहे. शुक्रवारी (दि.8) सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात जाउन महाआरती करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी नउ वाजेला वर्धापन दिन कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. यानिमित्ताने मनसेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल होणार आहेत. वर्धापन दिन होत असल्याने पक्षाकडून शहर भगवेमय केले आहे. राजगड कार्यालयासह शहरातील महत्वाचे चौक मनसेच्या ध्वजाने सजविण्यात आले आहेत. कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह आहे.