पंचवटी : बनावट सोन्याचे दागिने विक्री करणाºया धनाराम मन्साराम सोळंकी यास पोलिसांनी अटक केली. बोरगड येथील हर्षल छाजेड यांना संशयिताने बनावट सोन्याचे दागिने विक्री करण्याचा प्रयत्न केला. छाजेड यांनी सोन्याची गिन्नी एका सराफाला दाखविल्या. त्यावरून ते बनावट सोने असल्याचे उघड झाले. संशयिताचे बिंग फुटल्याने त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
बनावट दागिने विक्री करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:13 IST