मालेगावी पिस्तोल बाळगणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 13:26 IST2019-03-20T13:25:57+5:302019-03-20T13:26:31+5:30

मालेगाव: शहरातील रजाचौक भागात अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीररित्या पिस्तोल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली.

 Arrested in Malegavi pistol | मालेगावी पिस्तोल बाळगणाऱ्यास अटक

मालेगावी पिस्तोल बाळगणाऱ्यास अटक

मालेगाव: शहरातील रजाचौक भागात अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीररित्या पिस्तोल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तोल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी अंबादास डोमसे यांनी फिर्याद दिली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून काल मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास शहरातील रजाचौक भागात अवैधरित्या पिस्तोल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असलेला इम्रानखान अताउल्लाखान उर्फ शेट्टी (२६) रा.दातारनगर यास पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पिस्तोल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पवारवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

Web Title:  Arrested in Malegavi pistol

टॅग्स :Nashikनाशिक