बुलेट चोरणाऱ्या टोळक्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:21 IST2018-05-09T01:21:52+5:302018-05-09T01:21:52+5:30

नाशिक : शहरातील विविध ठिकाणांहून महागड्या बुलेट दुचाकींची चोरी करणाºया त्रिकुटास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़

Arrested bullet thieves | बुलेट चोरणाऱ्या टोळक्यास अटक

बुलेट चोरणाऱ्या टोळक्यास अटक

ठळक मुद्देसाडेतीन लाख रुपये किमतीच्या तीन बुलेटही जप्तदुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश

नाशिक : शहरातील विविध ठिकाणांहून महागड्या बुलेट दुचाकींची चोरी करणाºया त्रिकुटास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़ प्रदीप कासार (रा. शेवगे दारणा, ता. नाशिक), बाळासाहेब कासार (रा. शेवगे दारणा) व वैभव ढेरिंगे (रा. लहवित, ता. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीच्या तीन बुलेटही जप्त करण्यात आल्या आहेत. शहरातून महागड्या बुलेट दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण चांगलेच वाढल्याने या दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते़ शहर गुन्हे शाखेतील युनिट दोनच्या पथकातील पोलीस शिपाई गणेश सानप यांना या त्रिकुटाबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, विजय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, कर्मचारी योगेश सानप, बाळा नांद्रे, देवकिसन गायकर, विजय पगारे, रमेश घडवजे, संजय ताजने यांनी सापळा रचून संशयिताना शेवगे दारणा तसेच लहवित येथून अटक केली. पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पुणे शहरातील फरासखाना, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथूून चोरी केलेल्या साडेतीन लाख रुपये किमतीच्या तीन बुलेट चोरल्याची कबुली दिली़ हे तिघेही सराईत चोरटे असून त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे़
दरम्यान, या टोळीचा सूत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत़

Web Title: Arrested bullet thieves

टॅग्स :Crimeगुन्हा