प्रार्थनास्थळासमोर हायमास्टची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 19:14 IST2019-01-08T18:35:51+5:302019-01-08T19:14:16+5:30
येवला : सायगाव येथील मुस्लिम समाज बांधवांच्या प्रार्थनास्थळासमोर अंधार असल्याने येथे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत अखेर नारायणगिरी महाराज फाऊंडेशनच्या पुढाकारातून या प्रार्थनास्थळासमोर हायमास्टचीव्यवस्था करण्याकरीता फशऊंडेशनतर्फे धनादेश देण्यात आला.

सायगाव येथील प्रार्थनास्थळाजवळ हायमास्ट बसविण्यासाठी मदतीचा धनादेश देताना उपसभापती रुपचंद भागवत आदींसह मुस्लीम बांधव.
येवला : सायगाव येथील मुस्लिम समाज बांधवांच्या प्रार्थनास्थळासमोर अंधार असल्याने येथे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत अखेर नारायणगिरी महाराज फाऊंडेशनच्या पुढाकारातून या प्रार्थनास्थळासमोर हायमास्टचीव्यवस्था करण्याकरीता फशऊंडेशनतर्फे धनादेश देण्यात आला.
येवला तालुक्यातील सायगाव येथील शेख वस्तीला येवला लासलगाव शिवसेना विधानसभा संघटक उपसभापती रु पचंद भागवत यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करायला प्रार्थनास्थळी येणाºया वृद्धांना अंधारात यावे लागत असल्याने अनेक अडचणी येतात, त्यामुळे येथे लाईटची व्यवस्था करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याकरीता नारायणगिरी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष विष्णु भागवत यांच्या माध्यमातून हायमास्ट लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता धनादेशद्वारे आर्थिक मदत करण्यात आली. त्यानंतर या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उस्मान शेख दिलीप भागवत, आप्पासाहेब भागवत, देविदास जानराव, अजीज शेख, सलीम शेख, शब्बीर शेख, कादुभाई शेख, बाबूलाल शेख, अर्षद शेख, अमीन शेख, समीर शेख, ज्ञानेश्वर भागवत, समाधान सोमासे, संतोष गोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.