शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

लष्कराने नागरी वस्तीत लावला रस्ता बंदचा फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:20 PM

देवळाली कॅम्प : येथील विजयनगर परिसरातील अमित सोसायटीसह नागरी वस्तीचा रस्ता लष्कर प्रशासनाकडून बंदचा करण्याचा लावण्यात आलेल्या सूचनाफलकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देघरमालक हवालदिल : माजी नगरसेवक करणार उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळाली कॅम्प : येथील विजयनगर परिसरातील अमित सोसायटीसह नागरी वस्तीचा रस्ता लष्कर प्रशासनाकडून बंदचा करण्याचा लावण्यात आलेल्या सूचनाफलकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या परिसराबरोबरच नानेगावला जाणारा रस्ताही बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, रस्त्याबाबत नगरसेवक करंजकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. देवळाली छावणी परिषदेच्या हद्दीत विजयनगर परिसर नागरी वस्तीचा परिसर आहे. याच नागरी वस्तीलगत दुसऱ्या महायुद्धाच्या गरजेसाठी ब्रिटिशांनी विमानतळ तयार केले होते. विशेष म्हणजे यासाठी आवश्यक जागा शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या. या जागेचा करारनामा संपल्यानंतरही लष्करी प्रशासनाने त्याच जागेवर गेल्या वर्षभरात तातडीने नवीन कार्यालये बांधकाम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. स्थानिक रहिवाशांमध्ये घबराटलष्करी प्रशासनाने अचानकपणे लावलेल्या सूचनाफलकामुळे स्थानिक रहिवाशांना रस्ताअभावी लाखो रुपये खर्च करून बांधलेली घरे तर सोडून द्यावे लागणार नाही ना, अशीच भीती वाटत आहे. सद्य:परिस्थितीत या परिसरात अनेकांनी पंधरा लाख रुपये गुंठ्याने जागा विकत घेऊन घरे बांंधली आहेत. अनेकजण तर आपल्या घराचे काय होणार, याच चिंतेत दोन दिवसांपासून दिसत आहे. नानेगावला जाण्यासाठी असणाºया एकमेव रस्ताही बंद झाला तर गावकºयांना दहा किलोमीटर रोजचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. भगूर नानेगाव रस्त्याबाबत लष्कर व ग्रामस्थांमध्ये अनेकदा पत्रव्यवहार होऊन वीस मीटर अंतराचा रस्ता ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लष्कराकडून रस्ता बंदबाबत फलक लावण्यात आल्याने दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे.

टॅग्स :devlali-acदेवळालीStrikeसंप