शस्त्रसाठ्याचा ताळमेळ बसेना; नाशिक ग्रामिण पोलिसांचा सावधगिरीने सुक्ष्म तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 03:59 PM2017-12-18T15:59:29+5:302017-12-18T16:00:45+5:30

 Arms control; A microbial investigation by the rural police of Nashik | शस्त्रसाठ्याचा ताळमेळ बसेना; नाशिक ग्रामिण पोलिसांचा सावधगिरीने सुक्ष्म तपास

शस्त्रसाठ्याचा ताळमेळ बसेना; नाशिक ग्रामिण पोलिसांचा सावधगिरीने सुक्ष्म तपास

Next
ठळक मुद्देजप्त केलेल्या साठ्याचा ताळमेळ बसत नसल्याने पोलीस चक्रावले सर्वच शक्यता लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत दहशतवादविरोधी पथकदेखील याप्रकरणी सतर्क

नाशिक : चांदवडजवळ पोलिसांनी नाकाबंदी करून ताब्यात घेतलेला दाऊदचा शार्पशूटर व त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक किमतीच्या शस्त्रसाठ्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सावधगिरी बाळगली जात आहे. विशेष म्हणजे उत्तरप्रेदशमधून लुटलेल्या शस्त्रांचा आणि जप्त केलेल्या साठ्याचा ताळमेळ बसत नसल्याने पोलीस चक्रावले आहेत.
सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा करत आहे; मात्र याबाबत गुन्हे शाखेच्या अधिका-यांकडून कु ठलीही माहिती दिली जात नाही किंवा तपास कुठल्या दिशेने पुढे सरकला आहे, तपासाबाबतची प्रगती आदींच्या बाबतीत कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांनाही न देता अत्यंत सावधगिरीने व सूक्ष्मरीत्या या प्रकरणाचा राज्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तपास करत आहे. एकूणच यावरून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेण्यासारखे असून, महत्त्वाचे धागेदोरे तपासी यंत्रणेच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही व पोलीस यंत्रणेला खात्रीलायक धागेदोरे व उर्वरित संशयित आरोपींचा थांगपत्ता तसेच लुटलेल्या शस्त्रसाठ्यापैकी काही शस्त्रे कुठे प्रवासात संशयितांनी लपविली किंवा कोणाला विक्री केल्याचा संशय वर्तविला जात आहे. अशा सर्वच शक्यता लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. दहशतवादविरोधी पथकदेखील याप्रकरणी सतर्क झाले असून, पथकाने नाशिकला येऊन स्थानिक अधिका-यांशी चर्चाही केली आहे. संशयित आरोपींकडे मोठ्या प्रमाणात शस्त्राचा साठा तर सापडला; मात्र मोठ्या संख्येने बेशुद्ध करण्याच्या औषधांच्या बाटल्या व ४८ हजारांची रोकडही पोलिसांनी हस्तगत केली आहे. यावरून या सर्व प्रकरणाची व्याप्ती भली मोठी असून, त्याविषयी गुप्तता बाळगण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेसह संपूर्ण तपास यंत्रणेला गृह विभागाकडून मिळाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

Web Title:  Arms control; A microbial investigation by the rural police of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.