शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हैं तय्यार हम : ‘हॅप्पी लॅण्डिंग, जय हिंद...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:00 IST

नाशिकच्या गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या(कॅट्स) दीक्षांत सोहळा शनिवारी (दि. ११) पार पडला.

ठळक मुद्दे प्रशिक्षण कालावधीचे ३२ वर्षे पूर्ण केले

नाशिक : भारतीय सैन्यादलाचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘कॅट्स’च्या तळावरून लढाऊ वैमानिकांच्या ३१व्या तुकडीचे २९ वैमानिक तसेच सहा प्रशिक्षक देशसेवेत दाखल झाले. या वैमानिक व प्रशिक्षकांना दिमाखदार सोहळ्यात ‘एव्हिएशन विंग’ व ‘एव्हिएशन इन्स्ट्रक्टर बॅज’ प्रदान करण्यात आले.

नाशिकच्या गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’च्या(कॅट्स) दीक्षांत सोहळा शनिवारी (दि. ११) पार पडला. युद्धजन्य परिस्थितीत हेलिकॉप्टर चालविणे, शत्रूवर हवाई हल्ला करणे, भुदलाला रसद पुरविणे, जखमींना सुरक्षितपणे उपचारार्थ तत्काळ हलविणे आदी बाबींचे शास्त्रशुद्ध सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर चालनाचे प्रशिक्षण या केंद्रातून प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. वैमानिकांचा दीक्षांत सोहळा लष्करी थाटात पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी स्कूल आॅफ आर्टीलरी, देवळालीचे लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग सलारीया होते.

http://www.lokmat.com/videos/nashik/army-aviation-passing-our-parred-nashik/

चित्ता, चेतक, धु्रव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने व चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिकांनी रंगलेला ‘कॅट्स’चा दीक्षांत सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. सैनिकी ब्रास बॅण्ड पथकाच्या विविध सुरांच्या तालावर प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर करत उपस्थित लष्करी अधिकारी वर्गाला मानवंंदना दिली.धाडस व कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक यशस्वी होतो.‘एव्हिएशन स्कूल’च्या उत्तम व्यासपीठावरुन तुम्ही दाखल झाले आहात, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यपूर्ण कामगिरीवर भर द्या, असा गुरुमंत्र सलारिया यांनी यावेळी दिला. सुरक्षित उड्डाण करत लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. शारीरिक व मानसिक आरोग्य एका उत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकासाठी आवश्यक ठरते, ह विसरू नये, हॅप्पी लॅण्डिंग, जय हिंद म्हणून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

दरम्यान, प्रशिक्षण कालावधीत आपल्या कौशल्यपूर्ण अशा उत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन अंकित मलिक यांना मानाची ‘सिल्वर चित्ता’ तसे मेजर प्रभप्रीत सिंग यांना ‘मेजर प्रदीप अग्रवाल’स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. येथील केंद्राने आपल्या प्रशिक्षण कालावधीचे ३२ वर्षे पूर्ण केले असून ३३व्या वर्षात पदार्पण केले आहेत. या कालावधीत अनेक प्रशिक्षित कौशल्यधिष्ठित लढाऊ हेलिकॉप्टर चालविणारे वैमानिकांच्या तुकड्या येथून घडविल्या गेल्या आहेत. त्यामुळे ‘कॅटस्’चा इतिहास वैभवशाली राहिला आहे.

टॅग्स :NashikनाशिकDefenceसंरक्षण विभागIndian Armyभारतीय जवान