शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आर्दा नक्षत्राने बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:49 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील जळगाव नेऊर, पुरणगाव, शेवगे, सातारे, पिंपळगाव लेप, परिसरात मृग नक्षत्रात शेतकर्यांनी पेरणी केली होती, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, पण गेली चार पाच दिवसांपासून आद्रा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे,

ठळक मुद्देजळगाव नेऊर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

लोकमत न्युज नेटवर्कजळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील जळगाव नेऊर, पुरणगाव, शेवगे, सातारे, पिंपळगाव लेप, परिसरात मृग नक्षत्रात शेतकर्यांनी पेरणी केली होती, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांना दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, पण गेली चार पाच दिवसांपासून आद्रा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे,दि. २७, २८, २९ ला अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरी पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने अचानक झालेल्या तापमान वाढीनंतर खिरपाच्या पेरण्या धोक्यात आल्याचे दिसून येत होते. मात्र शनिवार, रविवार, तर सोमवारी चार वाजता व रात्री आठ वाजेच्या दरम्यान जळगाव नेऊर, शेवगे सातारे, पिंपळगाव लेप, जऊळके, मुखेड फाटा आदी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.मागील तिन दिवसांपासून सातत्याने दररोज सरी कोसळत असल्याने अजून दोन तीन पाऊस झाल्यास भूजल पातळीचे प्रमाण वाढणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. दरम्यान काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होत असल्याने शेतकरी पिकांच्या नुकसानीची भीती देखील व्यक्त करत आहे,विशेषता कोवळ्या अवस्थेतील मका, बाजरी तसेच ज्यांनी लाल कांद्याची रोपे टाकलेली त्यांना या पावसाचा फटका बसणार आहे. काही ठिकाणी पावसाने शेतातील कांदा रोपे वाहिल्याचे प्रकार घडले आहे.प्रतिक्रि या...मृग नक्षत्रात पेरणी केल्यावर मध्यांतर पाच-सहा दिवस खÞंड पडल्याने पिके धोक्यात आली होती पण आर्दा नक्षत्रात चाÞंगला पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.- साईनाथ गचाले, शेतकरी, सातारे.(फोटो ३० जळगावनेउर)येवला तालुक्यातील शेवगे येथे सोमवारी झालेल्या पावसाने शेतात साचलेले पाणी.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस