नाशिकमधील आर्किटेक्ट, रंगकर्मी विवेक पाटणकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 13:38 IST2020-05-05T13:38:34+5:302020-05-05T13:38:41+5:30
राज्य नाट्य स्पर्धेतील स्वप्नपक्षी या नाटकातील अभिनयाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाले होते.

नाशिकमधील आर्किटेक्ट, रंगकर्मी विवेक पाटणकर यांचे निधन
नाशिक- नाशिकमधील प्रख्यात आर्किटेक्ट आणि ज्येष्ठ रंगकर्मी विवेक पाटणकर (68) यांचे निधन झाले. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उत्तम कलाकार म्हणून ते नाशिककरांना ज्ञात होते. राज्य नाट्य स्पर्धेतील स्वप्नपक्षी या नाटकातील अभिनयाबद्दल त्यांना पुरस्कार मिळाले होते. तसेच आनंद या नाटकासाठी त्यांनी तयार केलेला डमरूच्या आकाराचा फिरता रंगमंच राज्यभरात गौरवला गेला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे.