शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्भया मॅरेथॉन’मध्ये धावणार आर्ची, जान्हवी अन् अजिंक्य रहाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 17:28 IST

‘एक धाव स्वत:साठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी...’ असे स्पर्धेचे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत ३,५,१०,२१ किलोमीटरच्या गटात अनुक्रमे ९ ते १२, १५ ते ४५ आणि १८ ते ५० या वयोगटातील महिला, पुरूषांना सहभागाची संधी

ठळक मुद्देरविवारी (दि.८) पहाटे ५वाजेपासून स्पर्धेला सुरूवात जागतिक महिला दिनाचे औचित्य

नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रविवारी (दि.८) ‘निर्भया मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेतून महिला सुरक्षिततेचा नारा नाशिककरांकडून बुलंद केला जाणार आहे. यामध्ये अबालवृध्दांसह चक्क सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू, अभिनेत्री जान्हवी कपूर, सैयामी खेर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासारखे सेलिब्रिटीही धावणार आहेत.‘एक धाव स्वत:साठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी...’ असे स्पर्धेचे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत ३,५,१०,२१ किलोमीटरच्या गटात अनुक्रमे ९ ते १२, १५ ते ४५ आणि १८ ते ५० या वयोगटातील महिला, पुरूषांना सहभागाची संधी असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. रविवारी पहाटे ५वाजेपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. प्रथम २१ किलोमीटरचे स्पर्धक धाव घेणार आहेत. प्रत्येक गटासाठी वेगवेगळे प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील २१ व १० किलोमीटरच्या गटासाठी रोख रक्कम व भेटवस्तू पारितोषिकाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. पहिले पाच स्पर्धक या दोन्ही गटांमधून निवडण्यात येणार आहे. ३कि.मी.च्या अंतरापर्यंत नाशिककरांसाठी ‘फन रन’ असणार आहे. स्पर्धेच्या नोंदणीकरीता स्वतंत्र संकेतस्थळ आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच पोलीस नियंत्रण कक्षातूनही आवश्यक ती माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. जवळच्या पोलीस ठाण्यातदेखील सहभागासाठी अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत (दि. २९) नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. महिला सुरक्षेसाठी मॅरेथॉनमध्ये सहभागी होत धाव घेण्याचे आवाहन नांगरे पाटील यांनी नाशिककरांना केले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMarathonमॅरेथॉनWomenमहिलाRinku Rajguruरिंकू राजगुरूJanhavi Kapoorजान्हवी कपूरAjinkya Rahaneअजिंक्य रहाणेVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील