बोलठाण येथील जलवहिनी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 07:00 PM2021-02-09T19:00:20+5:302021-02-09T19:00:53+5:30

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणारी जलवहिनी सोमवारी (दि.८) रात्री काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. पाणी पुरवठा व्यवस्था विस्कळीत करणे व पाणी टंचाई होऊन गावास पाणी मिळू नये ह्या हेतूने हे काम झाल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने तपास करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

The aqueduct at Bolthan burst | बोलठाण येथील जलवहिनी फोडली

बोलठाण येथील जलवहिनी फोडली

Next
ठळक मुद्देनांदगाव : समाजकंटकांचा तपास करण्याची मागणी

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणारी जलवहिनी सोमवारी (दि.८) रात्री काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. पाणी पुरवठा व्यवस्था विस्कळीत करणे व पाणी टंचाई होऊन गावास पाणी मिळू नये ह्या हेतूने हे काम झाल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने तपास करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
अशा प्रकारच्या कृतीने गावास वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यास ही ग्रामपंचायत मागे हटणार नाही, असे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी सांगितले. याबाबत नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा देखिल नोंदवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाईपलाईन तोडफोडीचे प्रकार याआधी सुद्धा २ ते ३ वेळा झाले मात्र सोमवारी फोडण्यात आलेली पाईप लाइन ही मुख्य असल्याने पाणीपुरवठा व्यवस्था काही काळ विस्कळीत राहू शकते असे सांगण्यात आले. 

Web Title: The aqueduct at Bolthan burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.