नियतीचे कालचक्र फिरल्याने कुंभार कारागिर गपगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 01:02 PM2020-04-10T13:02:20+5:302020-04-10T13:02:48+5:30

येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योग व्यवस्थाच कोलमडली. गाव खेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागिर ...

 Aquarius artisans chant as the cycle of destiny revolves | नियतीचे कालचक्र फिरल्याने कुंभार कारागिर गपगार

नियतीचे कालचक्र फिरल्याने कुंभार कारागिर गपगार

googlenewsNext

येवला : कोरोनाच्या आपत्तीने संपूर्ण उद्योग व्यवस्थाच कोलमडली. गाव खेड्यातील छोटे उद्योगही बंद झाले. परंपरागत व्यवसाय असणारा कुंभार कारागिर वर्षभर मेहनत करून उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी माठ  बनवतो, कोरोनाच्या संकटाने मात्र बनवलेले माठ घरातच पडून राहिल्याने कुंभार कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चक्र फिरवत नवनिर्मिती करणाऱ्या या कारागिरांना नियतीचे कालचक्र फिरल्याने ऐन हंगामात घरात गपगार बसण्याची वेळ आली आहे.
उन्हाची तीव्रता वाढू लागताच मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये माठ, रांजण गरिबांचे फ्रिज म्हणून बाजारात विक्रीसाठी येत असतात. परंतु  कोरोनाच्या पाश्र्­वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने  गावोगावचे बाजार बंद झाले आहेत. बाजार नाहीत, परिणामी विक्री नाही यामुळे कुंभार कारांगिरापुढे पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्­न निर्माण झाला आहे. 
मार्च, एप्रिल, मे या कालावधीत मातीच्या माठ, रांजण यांना मोठी मागणी असते. या दरम्यान जमा झालेल्या पुंजीवर संपूर्ण वर्षाचे गणित कुंभार कारागीर जमवतात. कोरोना आपत्तीने या व्यवसायावर मोठे संकट ओढवले असून कुठपर्यंत हे लॉकडाऊन चालेल व कधी बाजारपेठ खुली होईल याबाबत साशंकता असल्याने कुंभार कारागिर आर्थिक संकटात सापडला आहे. परंपरागत कला जपत माठ बनवणे व्यतिरिक्त पोट भरण्याचे दुसरे साधन नसर्णा­या कुंभार कारागिरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्­न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे माठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य माती, उसाचा भुकठा, भाजण्यासाठी लागणारे इंधन यांचा खर्चही अंगावर पडला आहे.  शासनाने कुंभार कारागिरांना उदरनिर्वाहासाठी मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. 
--------
कोट...
आमचा पिढीजात व्यवसाय आहे. या व्यवसायांत आमची हयात घालवत आहे. आवा मध्ये जसा माठ भाजावा तसे आमचे हृदय माठ तयार करून हि विक्री होत नसल्याने भाजत आहेत.
- रंगनाथ जाधव, कारागिर, कुसूर

Web Title:  Aquarius artisans chant as the cycle of destiny revolves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक